Home > Festive > एकवीरा महिला मंडळ दहिसर यांचा हळदी कुंकू कार्यक्रम संपन्न.

एकवीरा महिला मंडळ दहिसर यांचा हळदी कुंकू कार्यक्रम संपन्न.

loading...
एकवीरा महिला मंडळ दहिसर यांचा हळदी कुंकू कार्यक्रम संपन्न.

दिनांक २५ जानेवारी २०२५ रोजी एकवीरा महिला मंडळ दहिसर यांचा हळदी कुंकू कार्यक्रम पार पडला. विद्या सावे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला. त्यांची पूर्ण टीम शितल पाटील, निमा सावे, रंजना सावे, मिनल सावे, रजनी राऊत, विद्या वर्तक कल्पलता पाटील, प्रतिक्षा सावे, रंजना राऊत, जयंती वर्तक कार्यात सहभागी होती. उखाणे घेताना प्रत्येकाने सद्यस्थितीवर उखाणे बनवून कार्यक्रमाची शोभा वाढवली. या कार्यक्रमात पन्नास बायकांनी हजेरी लावली. एकवीरा भजन मंडळाच्या सुंदर भजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. तिळगुळ सोबत वाढवळी परंपरागत रवळी सर्वांनी खाल्ली. हे औचित्य साधून महीलांना इमारत बांधकाम साठी लागणाऱ्या निधीची जाणीव करून दिली व सर्वांना मदत करण्याकरिता आवाहन केले. या बरोबरीने मंडळातील तीन महीलांनी इमारत निधिचे चेक दिले . शितल पाटील 25000/- संध्या म्हात्रे 11000/- विद्या सावे 25000/- आपल्या संघ चिटणीस रजनी राऊत मॅडम यांच्या स्वाधीन केले. त्याच बरोबरीने नविन महिला समितीची स्थापना करण्यात आली. सर्वांनी ही जबाबदारी पुन्हा एकदा विद्या सावे हिने घ्यावी असे सुचवले. यावर सर्वांनी अनुमोदन दिले. पुढील तिन वर्षासाठी समिती स्थापन करण्यात आली. बऱ्याच महिलांची सहाय्यक सदस्य म्हणून आपले नाव दिले. प्रचंड उत्साह आणि आनंद ओसंडून वाहत होता. उपस्थित महिलांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली. हेच वातावरण नेहमी रहावे हिच ईश्वर चरणी प्रार्थना.

loading...
loading...
loading...
loading...
loading...
loading...
loading...
Comments

सुंदर सख्यांचा सुंदर मेळावा ❤️

👌👌

view all
Category

Sports      Education      Weather      Entertainment      Politics      Business      Economics      Health      Sad Demise      Current Affairs      Festive      Achievements     
Festive

logo
Download our app by clicking the link below :
logo logo
Useful Links

© 2024 SKS Connect | All Rights Reserved | Powered By OTET Infosystems