Home > Current Affairs > रोटरी क्लब ऑफ पालघर अध्यक्षपदी भूषण सावे (केळवे)

रोटरी क्लब ऑफ पालघर अध्यक्षपदी भूषण सावे (केळवे)

loading...
रोटरी क्लब ऑफ पालघर अध्यक्षपदी भूषण सावे (केळवे)

रोटरी क्लब ऑफ पालघरच्या रोटरी वर्ष २०२६-२७ साठीच्या नव्या कार्यकारिणीचा पदग्रहण समारंभ दादोबा ठाकूर हॉल, पालघर येथे मोठ्या उत्साहात आणि दिमाखदार वातावरणात पार पडला. समाजसेवेची परंपरा अधिक व्यापक करण्याचा निर्धार व्यक्त करत नव्या पदाधिकाऱ्यांनी पदभार स्वीकारला.समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रोटेरियन राजन दुआ उपस्थित होते. याशिवाय लेफ्टनंट गव्हर्नर रोटेरियन देवांग गोराडिया, चीफ प्रिन्सिपल एड रोटेरियन अजित दुबे, डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी रोटेरियन मिलिंद उलकंदे तसेच असीस्टंट गव्हर्नर ब्रिगेडियर रोटेरियन अजित श्रीवास्तव यांच्यासह अनेक जिल्हास्तरीय मान्यवरांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढविली. यावेळी रोटेरियन भूषण सावे -केळवे यांनी रोटरी क्लब ऑफ पालघरच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली, तर रोटेरियन अमित ए. पाटील यांनी सचिवपदाची जबाबदारी स्वीकारली. नव्या संचालक मंडळातील पदाधिकाऱ्यांचाही विधिवत पदग्रहण सोहळा पार पडला. मार्गदर्शनपर भाषणात डिस्ट्रिक्ट गव्हर्नर राजन दुआ यांनी नव्या कार्यकारिणीचे अभिनंदन करत रोटरीच्या “Service Above Self” या ब्रीदवाक्याला अनुसरून समाजहिताचे अधिक प्रभावी उपक्रम राबविण्याचे आवाहन केले. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण संवर्धन, युवक विकास आणि समाजकल्याण या क्षेत्रांमध्ये नाविन्यपूर्ण आणि लोकाभिमुख प्रकल्प राबविण्यासाठी त्यांनी प्रेरणा दिली. नवनियुक्त अध्यक्ष भूषण सावे यांनी आपल्या मनोगतात क्लबच्या सर्व सदस्यांचे, ज्येष्ठ रोटेरियन्सचे, कुटुंबीयांचे आणि हितचिंतकांचे आभार व्यक्त केले. आगामी वर्षात सामाजिक, शैक्षणिक, आरोग्यविषयक तसेच पर्यावरणपूरक उपक्रमांच्या माध्यमातून अधिकाधिक नागरिकांपर्यंत सेवा पोहोचविण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला. सचिव अमित ए. पाटील यांनीही संघभावना आणि सामूहिक प्रयत्नांच्या बळावर रोटरीची समाजसेवा अधिक प्रभावी करण्याचा विश्वास व्यक्त केला.समारंभानंतर उपस्थित मान्यवर आणि सदस्यांनी स्नेहभोजनाचा आनंद घेत परस्पर मैत्री, सहकार्य आणि सेवाभाव अधिक दृढ करण्याचा निर्धार व्यक्त केला. उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलेल्या या पदग्रहण सोहळ्याने रोटरी क्लब ऑफ पालघरच्या नव्या सामाजिक वाटचालीची सकारात्मक सुरुवात झाली.

loading...
Comments

view all
Category

Sports      Education      Weather      Entertainment      Politics      Business      Economics      Health      Sad Demise      Current Affairs      Festive      Achievements     
Current Affairs

logo
Download our app by clicking the link below :
logo logo
Useful Links

© 2024 SKS Connect | All Rights Reserved | Powered By OTET Infosystems