Home > Politics > *डॉक्टर श्री. नितीश राऊत ब्रिटन मध्ये महापौर पदावर विराजमान*

*डॉक्टर श्री. नितीश राऊत ब्रिटन मध्ये महापौर पदावर विराजमान*

loading...
*डॉक्टर श्री. नितीश राऊत ब्रिटन मध्ये महापौर पदावर विराजमान*

*दादरमधील सोक्ष समाजाचे डॉक्टर श्री. नितीश राऊत* *ब्रिटन मध्ये महापौर पदावर विराजमान झाल्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन !* मुंबईतच बालपण आणि सुरुवातीचे वैद्यकीय शिक्षण घेतलेले दादरमधील एक मराठी डॉक्टर ब्रिटनमधील ऐतिहासिक रॉयल टाऊन ऑफ सटन कोल्डफिल्डचे महापौर बनले आहेत. डॉ. नितीश राऊत यांना हा बहुमान मिळाला असून, या निमित्ताने मराठीचा झेंडा पुन्हा सातासमुद्रापार झळकला आहे.विशेष म्हणजे डाॕ.नितीश राऊत हे आपल्या सोमवंशी क्षत्रिय समाजातील आहेत याचा आपल्या सर्वांना गर्व वाटायला हवा.डॉक्टर श्री नितीश हे डॉ. गजानन राऊत चिंचणी / दादर ह्यांचे सुपुत्र तसेच स्व. विठ्ठल माया पाटील, विरार ह्यांचा मुलीचा मुलगा आहेत. मुंबईतील दादर येथील मूळ रहिवासी असलेल्या डॉ. नितीश राऊत यांची बर्मिंगहॅमजवळच्या ‘रॉयल टाउन ऑफ सटन कोल्डफिल्ड’च्या महापौरपदी नुकतीच निवड झाली. ‘रॉयल टाउन ऑफ सटन कोल्डफिल्ड’ला १५२८ मध्ये राजे हेन्री आठवे यांनी ‘रॉयल टाउन’चा दर्जा बहाल केला होता. ब्रिटनमधील मोजक्याच शहरांना हा सन्मान लाभला आहे. अशा ऐतिहासिक शहराच्या महापौरपदी २०२६-२७ वर्षासाठी डॉ. राऊत हे विराजमान झाले आहेत. डॉ. राऊत हे या शहराचे भारतीय वंशाचे पहिले महापौर, वेस्ट मिडलँड्स भागातील पहिले हिंदू महापौर आणि ब्रिटनमधील पहिले मराठी महापौर असल्याचे मानले जाते. दादर पश्चिम येथे बालपण गेलेले डॉ. नितीश यांचे शिक्षण किंग जॉर्ज शाळेतून झाले. त्यांनी १९९४ मध्ये जे. जे. मेडिकल कॉलेजमध्ये ‘एमबीबीएस’साठी प्रवेश घेऊन पदवी परीक्षा उत्तम गुणांनी उत्तीर्ण केली. त्यानंतर त्यांनी ग्रामीण भागांत जाऊन रुग्णसेवा करताना समाजसेवा करण्याची खूणगाठ मनाशी पक्की केली. पुढे त्यांनी ‘एमडी’ करून शीव मेडीकल कॉलेजमध्ये वर्षभर प्राध्यापक म्हणून काम केले. पुढे २००५ मध्ये ते प्रसूतीशास्त्राच्या अभ्यासासाठी ब्रिटनला रवाना झाले. महापौरपदासोबतच डॉ. राऊत हे ब्रिटनच्या राष्ट्रीय आरोग्य सेवेत सल्लागार स्त्रीरोगतज्ज्ञ म्हणून कार्यरत आहेत. वैद्यकीय शिक्षण, प्रशासन आणि सार्वजनिक कामांमध्येही त्यांचा सक्रिय सहभाग आहे. विशेष म्हणजे, ते सलग तिसऱ्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आले असून, प्रत्येक निवडणुकीत त्यांचे मताधिक्य वाढत गेले आहे. जय वाडवळ...!!

loading...
Comments

view all
Category

Sports      Education      Weather      Entertainment      Politics      Business      Economics      Health      Sad Demise      Current Affairs      Festive      Achievements     
Politics

logo
Download our app by clicking the link below :
logo logo
Useful Links

© 2024 SKS Connect | All Rights Reserved | Powered By OTET Infosystems