Home > Entertainment > मुंबई फ्युजन फेस्ट 2026 मध्ये दहिसरच्या कृपाली भूषण म्हात्रे शोस्टॉपर

मुंबई फ्युजन फेस्ट 2026 मध्ये दहिसरच्या कृपाली भूषण म्हात्रे शोस्टॉपर

loading...
मुंबई फ्युजन फेस्ट 2026 मध्ये दहिसरच्या कृपाली भूषण म्हात्रे शोस्टॉपर

Mumbai Fusion Fest 2026 अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या राजमुद्रा सेगमेंटमध्ये दहिसरच्या कृपाली भूषण म्हात्रे यांनी शोस्टॉपर म्हणून रॅम्पवर दिमाखदार उपस्थिती लावत प्रेक्षकांची वाहवा मिळवली. मिसेस मुंबई आणि श्रावण सुंदरी हे मानाचे किताब आपल्या नावावर करणाऱ्या कृपाली म्हात्रे या फॅशन क्षेत्रातील एक परिचित व्यक्तिमत्त्व आहेत. रॅम्प मॉडेल म्हणून त्यांनी अनेक प्रतिष्ठित फॅशन शोमध्ये सहभाग नोंदवला आहे. त्याचबरोबर त्या एक यशस्वी फॅशन डिझायनर आणि रॅम्प कोरिओग्राफर म्हणूनही कार्यरत आहेत. हा भव्य फॅशन शो 9 जून रोजी Ravindra Natya Mandir येथे उत्साहात पार पडला. कार्यक्रमाला Shiv Thakare हे सेलिब्रिटी गेस्ट म्हणून उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाची रंगत आणखी वाढली. राजमुद्रा सेगमेंटमध्ये शोस्टॉपर म्हणून कृपाली म्हात्रे यांनी सादर केलेल्या आकर्षक रॅम्प वॉकने प्रेक्षकांची विशेष दाद मिळवली. त्यांच्या यशामुळे दहिसर परिसरात कैैतुक होत आहे.

Comments

view all
Category

Sports      Education      Weather      Entertainment      Politics      Business      Economics      Health      Sad Demise      Current Affairs      Festive      Achievements     
Entertainment

logo
Download our app by clicking the link below :
logo logo
Useful Links

© 2024 SKS Connect | All Rights Reserved | Powered By OTET Infosystems