Home > Economics > बोर्डी येथे पूज्य अण्णासाहेब वर्तक स्मारक मंदिर पुनर्बांधणी मदत निधीसाठी भावभक्ती संगीताचा कार्यक्रम.

बोर्डी येथे पूज्य अण्णासाहेब वर्तक स्मारक मंदिर पुनर्बांधणी मदत निधीसाठी भावभक्ती संगीताचा कार्यक्रम.

loading...
बोर्डी येथे पूज्य अण्णासाहेब वर्तक स्मारक मंदिर पुनर्बांधणी मदत निधीसाठी भावभक्ती संगीताचा कार्यक्रम.

शनिवार दिनांक 17 जानेवारी 2026 रोजी, पूज्य अण्णासाहेब वर्तक स्मारक मंदिर पुनर्बांधणी मदत निधीसाठी.. बोर्डी गजिताई हॉल येथे, स्वरार्चन म्युझिकल अकॅडमी विरार ( राजेंद्र सावे.. बोर्डी विरार ) यांनी सो क्ष महिला मंडळ बोर्डी व परिसर यांच्या सहकार्याने भावभक्ती संगीताचा कार्यक्रम आयोजित केला. गायक श्री.रमेश धनावडे, श्री.दिलीप चंपानेरकर, सौ.सुप्रिया घाडीगावकर, श्री.राजेंद्र सावे, सौ.हंसा किशोर पाटील आणि सर्व वादक सहकारी यांनी रसिक श्रोत्यांना आपल्या सुमधुर स्वरानी मंत्रमुग्ध केले म्हणायला हरकत नाही.. संपूर्ण गाण्याच्या कार्यक्रमाचे सुरेख सूत्रसंचालन सौ. वंदना क. चुरी ( वाणगाव ) यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व उपस्थितांचे स्वागत सौ. रोशन राऊत, (बोर्डी व परिसर महिला मंडळ सचिव )यांनी केले. या कार्यक्रमासाठी सो क्ष स संघाचे अध्यक्ष मा. श्री. नरेश जनार्दन तथा भाईसाहेब राऊत, बोर्डी सो क्ष शाखेचे अध्यक्ष श्री. रमेश राऊत, बोर्डी व परिसर महिला मंडळ अध्यक्षा सौ. रंजना सावे तसेच गावातील समाज बंधुभगिनीनी कार्यक्रमाला उपस्थित राहून सुरेल संगीताचा आस्वाद घेतला. या मदतनीधीच्या कार्यक्रमातून जमा झालेली.. 52, 250/- रुपये रकमेचा चेक श्री. राजेंद्र हरिभाऊ सावे यांनी भाईसाहेबांच्या हाती सुपूर्द केला. तसेच याचवेळी.. कै. श्रीमती. हिरीबाई बळवंत सावे बोर्डी नेताजीरोड, आमची आजी.. हिच्या स्मरणार्थ पुन्हा एकदा सर्व नातवंडं, पतवंडं यांनी 25,000/- रु चा चेक भाईसाहेबांना सुपूर्द केला. याआधी 51,000/- रुपयांचा निधी देण्यात आला आहे. स्वरार्चन म्युझिकल अकॅडमी तर्फे श्री. राजेंद्र सावे यांना असेच कार्यक्रम आपल्या इतर गावांत सादर करण्याची खूप इच्छा आहे.. बोर्डी येथे देणगी मूल्य म्हणून रुपये 250/- व 500/- अशी तिकीट देण्यात आली होती. समाज बंधुभगिनींनी चांगला प्रतिसाद दिला. त्याबद्दल बोर्डी व परिसर महिला मंडळ व ज्यांनी ज्यांनी सहकार्य केले त्या सर्वांचे,तसेच आमचे संपूर्ण सावे कुटुंबं ( नेताजीरोड बोर्डी )विशेषतः सौ. अलका अरुण सावे व सौ. रोशन प्रकाश राऊत यांचे मनःपूर्वक धन्यवाद...🙏 सौ. वंदना क. चुरी 8424926106

loading...
loading...
loading...
loading...
Comments

view all
Category

Sports      Education      Weather      Entertainment      Politics      Business      Economics      Health      Sad Demise      Current Affairs      Festive      Achievements     
Economics

logo
Download our app by clicking the link below :
logo logo
Useful Links

© 2024 SKS Connect | All Rights Reserved | Powered By OTET Infosystems