विरार येथील श्री. सचिन यज्ञेश्वर पाटील यांचे सुपुत्र डॉ. राज सचिन पाटील यांनी वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन केले आहे. त्यांनी M.B.B.S. तसेच M.D. (Internal Medicine) या वैद्यकीय पदव्या प्राप्त केल्या आहेत. डॉ. राज पाटील यांच्या या यशामुळे पाटील कुटुंबीयांसह नातेवाईक, मित्रपरिवार आणि विरार परिसरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्यांच्या या यशाबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन! 💐💐 डॉ. राज सचिन पाटील यांना पुढील वैद्यकीय कारकिर्दीसाठी हार्दिक शुभेच्छा! त्यांच्या हातून समाजाची उत्तम आरोग्यसेवा घडो आणि त्यांच्या कार्याचा अनेक रुग्णांना लाभ मिळो, हीच सदिच्छा! 💐