*माकुणसार शाखेचा आगळावेगळा कौतुक समारंभ संघाचा ४५वा क्रीडा महोत्सव उमेळे शाखेच्या सौजन्याने नरवीर चिमाजी आप्पा मैदानावर साजरा झाला... _*यावर्षी आपले खेळाडू खेळले, क्रीडा महोत्सव संपला. आता पुढल्या वर्षीच पुढल्या वर्षी पाहू...*_ असा विचार न करता. या महोत्सवात माकुणसार शाखेतील ज्या खेळाडूंनी वैयक्तिक व सांघिक खेळांत जे काही यश संपादन केलं, त्या वैयक्तिक व सांघिक संघ खेळाडूंचा शाखेत आपुलकीने भेटवस्तू व रोख रक्कम देऊन सत्कार करण्यात आला. _खेळताना आपण कुठे कमी पडलो, कुठे योग्य ठरलो याबाबत उहापोह खेळाडूंनी मनोगतात व्यक्त केला. शाखेतील समाज बांधवांनी पुढील महोत्सवात खेळाडूंना मैदानावर येऊन प्रोत्साहन देण्यासाठी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले._ *या महोत्सवात उत्कृष्ट नियोजनबद्ध क्रीडा मैदाने,भोजन व्यवस्था सेवा दिल्याबद्दल उमेळे शाखेबाबत अभिनंदनीय गौरव उद्गार पाहुण्यांनी व्यक्त केले. शाखेतील खेळाडूंची उमेळे गावात शनिवारी रात्री राहण्याची व भोजनाची विनामूल्य सेवा दिल्याबद्दल समाधान व्यक्त करून उमेळे शाखेचे आभार व अभिनंदन व्यक्त करण्यात आले.