Home > Sports > सातवा सोमवंशी क्षत्रिय युवक मंडळ, आगाशी आयोजित महिला क्रिकेट स्पर्धा आणि वाडवळी खाद्यमहोत्सव

सातवा सोमवंशी क्षत्रिय युवक मंडळ, आगाशी आयोजित महिला क्रिकेट स्पर्धा आणि वाडवळी खाद्यमहोत्सव

loading...
सातवा सोमवंशी क्षत्रिय युवक मंडळ, आगाशी आयोजित महिला क्रिकेट स्पर्धा आणि वाडवळी खाद्यमहोत्सव

सोमवंशी क्षत्रिय युवक मंडळ, आगाशी आयोजित महिला क्रिकेट स्पर्धा आणि वाडवळी खाद्यमहोत्सव रविवार दिनांक १ डिसेंबर २०२४ रोजी के. जी. हायस्कूल, आगाशी इथे पार पडला. यंदाचं हे महिला क्रिकेट आणि खाद्यमहोत्सवाचं सातवं वर्ष आहे. क्रिकेट स्पर्धाचे उद्घाटन सौ. रश्मी शरद कवळी यांनी केले आणि खाद्यमहोत्सवाचे उद्धाटन तेजस्विनी महिला मंडळाचा अध्यक्षा आणि टूर कंपनीच्या संचालिका सौ. मेधा हरेश्वर राऊत यांच्या हस्ते झाले. उभयतांनी स्पर्धेसाठी शुभेच्छा देऊन मंडळाच्या कार्याचे कौतुक केले आणि मंडळाच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. महिला क्रिकेट स्पर्धेत म्हात्रेवाडी, पानवाडी, क्रॉसनाका, राऊतआळी, मालविडे, कवळीआळी, पाटीलआळी या गावांतील महिलांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत पानवाडी संघ विजेता ठरला आणि पाटीलआळी संघ उपविजेता ठरला. सौ. मनिषा अमर राऊत यांना उत्कृष्ट फलंदाज आणि सौ कामिनी आशिष म्हात्रे यांना उत्कृष्ट गोलंदाज हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. क्रिकेट स्पर्धेची बक्षिसे ही कै. मोहन अनंत कवळी यांच्या स्मरणार्थ श्रीमती. नुतन मोहन कवळी यांनी प्रायोजित केली होती. मंडळाने आयोजित केलेल्या खाद्यमहोत्सवात घोतोडी, पानवाडी, भेंडीभाट, राऊतआळी, मचकुंदवाडी, पाटीलआळी आणि कवळीआळी गावांकडून ऑम्लेटपाव, चुलीवरचं चिकन, वजडी मसाला, खिमापाव, मफीन्स, केक, पिझ्झा, कोल्डड्रिंक, चिकन फ्राय अशा अनेक खाद्यपदार्थांचे स्टॉल लावण्यात आले होते ज्याचा गावकऱ्यांनी आस्वाद घेतला.

loading...
loading...
loading...
loading...
loading...
loading...
loading...
loading...
Comments

view all
Category

Sports      Education      Weather      Entertainment      Politics      Business      Economics      Health      Sad Demise      Current Affairs      Festive      Achievements     
Sports

logo
Download our app by clicking the link below :
logo logo
Useful Links

© 2024 SKS Connect | All Rights Reserved | Powered By OTET Infosystems