Home > Business > प्रीति प्रशांत राऊत इंडियन एक्सप्रेस लिडरशिप पुरस्काराने सन्मानित

प्रीति प्रशांत राऊत इंडियन एक्सप्रेस लिडरशिप पुरस्काराने सन्मानित

loading...
प्रीति प्रशांत राऊत इंडियन एक्सप्रेस लिडरशिप पुरस्काराने सन्मानित

प्रीति प्रशांत राऊत, केळवे - विलेपार्ले, मुंबई यांना इंडियन एक्सप्रेस समुहातील, एक्सप्रेस फार्मातर्फे लिडरशिप कॅटॅगरीत २१ जुलै २०२३ रोजी हैदराबाद येथील ग्रॅन्ड हयात येथे पार पडलेल्या समारंभात गौरविण्यात आले. हा समारंभ एक्सप्रेस फार्मा, सिलिकन्ट इंडिया, बी ए एस एफ, मर्क, एअरनोव्ह, सिगाची, रोमॅको ईत्यादी नामांकित कंपन्यांनी पुरस्कृत केला होता. प्रीति गेली अनेक वर्षे फार्मा क्षेत्रात कार्यरत असून, त्यांच्या फॉर्म्युलेशन ड्रग डेव्हलपमेंटमधील उत्कृष्ट कार्याबद्दल आणि निर्भिड व कणखर नेतृत्वासाठी या वर्षीचा हा मानाचा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला. यापूर्वी त्यांनी डब्लू एच ओ तील कमिटीवर काम केलं आहे. त्यांनी त्यांच्या कंपनीचं यु एस आणि यु के येथील कोर्टातील डिपोजिशनवर प्रतिनिधित्व केलं आहे. ड्रग फॉर्म्युलेशनमध्ये त्यांचा हातखंडा असून, फार्मा क्षेत्रातील त्या सब्जेक्ट मॅटर एक्सपर्ट आहेत. सिप्ला येथे त्या रिसर्च एन्ड डेव्हलपमेंटच्या व्हाईस प्रेसिडेन्ट असून, या क्षेत्रात भारतभरच नव्हे तर परदेशातही नावाजलेल्या आहेत. वसई (होळी - राऊतवाडी) - विलेपार्ले येथे त्यांचं माहेरघर असून, त्यांच्या या यशाबद्दल त्यांच्या घरच्यांना, आप्त-स्वकियांना, वसई-केळवेकरांना आणि संपूर्ण समाजालाच सार्थ अभिमान वाटतो. प्रीति यांचं मनःपूर्वक अभिनंदन आणि त्यांच्या पुढील वाटचालींसाठी भरभरून शुभेच्छा!!! 💐💐

Comments

view all
Category

Sports      Education      Weather      Entertainment      Politics      Business      Economics      Health      Sad Demise      Current Affairs      Festive      Achievements     
Business

logo
Download our app by clicking the link below :
logo logo
Useful Links

© 2024 SKS Connect | All Rights Reserved | Powered By OTET Infosystems