Home > Achievements > SKS Connect Apps news

SKS Connect Apps news

loading...
SKS Connect Apps news

सोमवंशी क्षत्रिय समाजोन्नती संघ या संस्थेचे (पाचकळशी-वाडवळ या जाती साठी) स्वतंत्र ॲप सोक्ष संघ चे माननीय अध्यक्ष श्री नरेश जनार्दन राऊत यांच्या शुभहस्ते बुधवार दि. एक नोव्हेंबर 2023 रोजी सकाळी 11 वाजता संघ कार्यालय केळवे रोड येथे प्रकाशित झाले. हे ॲप बनविण्यासाठी संघाने जनसंशोधन समिती स्थापन केली होती. जनसंशोधन समिती चे प्रमुख श्री अमित रमाकांत पाटील (शाखा केळवा रोड), संघ उपाध्यक्ष डॉ. नरेश सावे (समिती समन्वयक), श्री निखिल नरेश राऊत (शाखा बोर्डी) यांनी हे ॲप बनविण्याची जबाबदारी OTET चे प्रो. श्री. अमेय बाळकृष्ण राऊत (शाखा माहीम) यांच्यावर सोपविली. या चार हुशार व कल्पक समाजबांधवांनी अनोखे ॲप बनवण्याची जबाबदारी घेऊन SKS Connect App. हे समाजाचे ॲप पूर्णत्वास आणल्याने समाजाचे स्वप्न साकार झाले आहे. या ॲपमुळे समाजाचे नाव पालघर ठाणे मुंबई जिल्ह्यात उंचावले आहे. या ॲप मध्ये समाजाची जनगणना होणार आहे. जॉब एम्प्लॉयमेंट कळणार आहे, समाजातील बिजनेसमन यांची माहिती होऊन एकमेकांना धंदेवाईक मदत होणार आहे. आपली माहिती उघड होऊ नये असे वाटत असेल त्यांच्यासाठी लॉक करण्याची योजना उपलब्ध आहे. या कार्यक्रमासमयी संघ फंड ट्रस्टचे मुख्य विश्वस्त मा. डॉ. सदानंद कवळी हे व समाज बांधव उपस्थित होते.

Comments

view all
Category

Sports      Education      Weather      Entertainment      Politics      Business      Economics      Health      Sad Demise      Current Affairs      Festive      Achievements     
Achievements

logo
Download our app by clicking the link below :
logo logo
Useful Links

© 2024 SKS Connect | All Rights Reserved | Powered By OTET Infosystems